WHAT'S NEW?
Loading...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार:-
-----------------------------------------------------------

• ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक उत्तम सिंग यांना 2016 या वर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला
• पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
उत्तम सिंग:-
• उत्तम सिंग यांचा जन्म 25 मे 1948 रोजी झाला. त्यांचे वडील सतारवादक होते. त्यांनी वडिलांकडून बालपणापासूनच संगीताचे धडे गिरवले.
• सात वर्षे मटका वाद्य, सहा महिने सतार वाद्य व दोन वर्षे गायनाचे शिक्षण घेतले.
• 1963 मध्ये त्यांनी नौशाद, मदन मोहन, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, राहुल देव बर्मन यांच्यासारख्या ज्येष्ठ संगीतकारांसोबत काम केले.
• राजश्री प्रॉडक्श्नच्या "मैंने प्यार किया‘, "हम आपके है कौन‘ या हिंदी; तसेच अनेक तमिळ आणि पंजाबी चित्रपटांसाठीही त्यांनी संगीत संयोजक म्हणून काम केले.
• मनोज कुमार यांच्या "पेंटरबाबू‘ व "क्ल"र्क‘ या चित्रपटांनाही संगीत दिले.
• 1992 मध्ये जगदीश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केले. यश चोप्रा यांच्या दिल तो पागल है, दुश्म न, फर्ज, दिल दिवाना होता है या गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.
• 1997 मध्ये "दिल तो पागल है‘ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. 2002 मध्ये "गदर - एक प्रेमकथा‘ या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक) मिळाला.
• सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील सदस्यांनी एकमताने उत्तम सिंग यांची निवड केली. या समितीत सांस्कृतिक कार्यप्रधान सचिव वल्सा नायर सिंह, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, स्वानंद किरकिरे, अजय व अतुल गोगावले आणि श्रेया घोषाल यांचा समावेश होता.

•या पूर्वी हा पुरस्कार :-
२०१५:- प्रभाकर जोग
२०१४:-कृष्णा कल्ले

🔹मंगळयानाचा ग्रहण काळ कमी करण्याचे पुढील वर्षी प्रयत्न

‘इस्रो’ अध्यक्षांची माहिती; मोहिमेला दोन वर्षे पूर्ण

मार्स ऑर्बिटर मिशन (मॉम) या भारताच्या मंगळ मोहिमेला काल दोन वर्षे पूर्ण झाली असून अपेक्षेपेक्षा यानाने अधिक काळ काम दिले आहे. आता पुढील वर्षी या अवकाशयानाचा अंधारात असण्याचा काळ म्हणजे ग्रहण काळ कमी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले, की मॉम मोहिमेला दोन वर्षे पूर्ण झाली असून त्याचा अपेक्षित कार्यकाल सहा महिने होता. त्यानंतर वर्षभर त्याच्या पाच पेलोडमधून मिळालेली माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने प्रसारित केली. ग्रहण काळात त्याला बॅटरीचा आधार घ्यावा लागतो. जर ग्रहण काळ कमी केला तर ती बॅटरी जास्त काळ टिकू शकेल. ग्रहण काळाचा परिणाम अवकाशयानाच्या कार्यक्षमतेवर कमी व्हावा यासाठी हा प्रयत्न केला जाणार असून अजूनही यानात बऱ्यापैकी इंधन आहे. त्यामुळे ते इतके दिवस कार्यरत राहू शकले.

मॉम म्हणजे मंगळयान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने सोडले होते. त्यासाठी पीएसएलव्ही सी २५ हा प्रक्षेपकही वापरण्यात आला होता. खोल अंतराळातील ३०० दिवसांच्या प्रवासानंतर हे यान २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आले होते. मंगळयानाने पहिल्या दोन वर्षांत मिळवलेली माहिती जाहीर करण्यात आली असून भारताच्या या मोहिमेला अमेरिकेच्या अवकाश संस्थेचा स्पेस पायोनियर पुरस्कार तसेच नि:शस्त्रीकरण व विकासासाठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिळाला होता.
यानाने मंगळाच्या उत्तर ध्रुवावरील संप्लवन प्रक्रियेवर प्रकाश टाकला असून तेथील कार्बन डायॉक्साइड व पाण्याचे बर्फ यांचे थर उन्हाळ्यात नष्ट होत असतात. त्याबाबतच्या माहितीत मॉमच्या निरीक्षणांनी भर पडली आहे.

परग्रहवासियांशी संपर्क करू नये! ; स्टीफन हॉकिंग यांचा इशारा

लंडन : प्रसिद्ध ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी मानवाने एलियनशी संपर्क करू नये, असे इशारा देताना म्हटले आहे. मानवापेक्षा जे तांत्रिकदृष्टय़ा अधिक प्रगत आहेत, त्यांच्याशी संपर्क न करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आपल्यापेक्षा कोणत्याही प्रगत संस्कृतीशी आपण संपर्क केल्यास काही तरी वेगळी स्थिती निर्माण होऊ शकते. जेव्हा मूळ अमेरिकन लोकांनी क्रिस्टोफर कोलंबस याला पाहिले तेव्हा ज्या प्रकारची स्थिती झाली होती, तशीच स्थिती प्रगत संस्कृतीशी संपर्क केल्यास होऊ शकते. ते त्या वेळी खूप चांगले झाले नाही, असे हॉकिंग यांनी नवीन ऑनलाइन व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

🔹लता मंगेशकर यांना 'बंग भूषण' जाहीर

बंगाल सरकारतर्फे दिला जाणारा 'बंग भूषण' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार गानसम्राज्ञी 'भारतरत्न' लता मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येत्या २० ऑक्टोबर रोजी मुंबईत येऊन लतादीदींना हा पुरस्कार प्रदान करणार आहेत.

बंगाली संगीतातील योगदानाबद्दल लतादीदींना हा पुरस्कार दिला जाणार आहे. ममता बॅनर्जी यांनी स्वत: एका फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. 'लतादीदींनी पुरस्कार स्वीकारण्याची तयारी दाखवल्यानं मला प्रचंड आनंद झाला आहे. त्यांचा सन्मान ही आमच्यासाठीही गौरवाची बाब आहे,' असं ममतांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी २० ऑक्टोबर रोजी मुंबईत येऊन लतादीदींना सन्मानित करतील. 'सारेगम'चे अध्यक्ष संजीव गोएंका हेही त्यांच्यासोबत असतील.

🔹सीफूड निर्यात करण्यात भारत जगात सातवा

विशाखापट्टनम - सीफूड निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत जगात सातव्या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य ( स्वतंत्र पदभार ) राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली .

विशाखापट्टनम येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय सीफूड प्रदर्शनाच्या कार्यक्रमात सीतारामन बोलत होत्या . " सागरी उत्पादनांच्या व्यावसायिकांनी या क्षेत्रात मोठा व्यवसाय दिसल्याने आज या क्षेत्राला भरभराट मिळाली आहे . त्यामुळे याचे श्रेय मी त्यांनाच देते . त्यांच्याशिवाय सीफूड करण्यात भारत जगात सातव्या क्रमांकावर पोचला नसता . '

सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण ( एमपीईडीए ) आणि भारतातील सीफूड निर्यात संघटनेने ( एसईएआय ) या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे . या प्रदर्शनाला केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री एम . वेंकय्या नायडू आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन . चंद्राबाबू नायडू यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते . स्थानिकांसह निर्यातीच्या बाजारपेठेतील व्यावसायिकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित आणि शाश्वत भारतीय सागरी उत्पादने घेणे हा या प्रदर्शनामागचा हेतू आहे .

🔹पाच पक्षांची नोंदणी रद्द

मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावूनही वार्षिक विवरणपत्र व लेखापरीक्षण अहवाल सादर न करणाऱ्या पाच राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे .मान्यता रद्द करण्यात आलेल्या पक्षांमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दल , ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, राष्ट्रीय जनता दल , ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग या पाच राजकीय पक्षांचा समावेश आहे .

या राज्यस्तरीय पक्षांना 26 ऑगस्ट 2016 रोजी अंतिम नोटीस बजावण्यात आली होती . तत्पूर्वी अनेकदा त्यांना कागदपत्रे सादर करण्याबाबत लेखी विनंतीही करण्यात आली होती ; परंतु त्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी आता रद्द करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे .

🔹सीमेवरील कुंपणाबाबतचे नैपुण्य भारताला देण्यास इस्रायल तयार

भारत व इस्रायल या दोन्ही देशांपुढे अनेक बाबतीत ‘समान आव्हाने’ असल्याचे सांगून, सीमेवरील कुंपण मजबूत करण्यासाठी आपल्याकडील विशेष नैपुण्य भारताला उपलब्ध करून देण्याची तयारी इस्रायलने दर्शवली आहे.

गेल्या आठवडय़ात उरी येथे हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आल्याचे मानले जात आहे. त्यामुळे इस्रायलचे भारतातील राजदूत डॅनियल कॅरमन यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
सध्याच्या घडामोडींकडे आपला देश काळजीने बघत असून, दहशतवादाच्या विरोधातील सहकार्य हा द्विपक्षीय संबंधांचा कायम घटक राहील, असे कॅरमन म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या यापूर्वीच्या इस्रायल दौऱ्यात त्यांना देशाची सीमेवरील तयारी दाखवण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.

इस्रायलला नेहमीच धोका राहिलेला असल्यामुळे आमच्याजवळ याबाबतचे विशेष नैपुण्य आहे. आमच्यासमोरील आव्हाने समान असून आमच्याकडे त्यासाठी उपायही आहेत. त्यामुळे याबाबत आपण एकत्र काम करू शकतो. यापूर्वी आम्ही इतर क्षेत्रात सहकार्य केले असून ते याही क्षेत्रात केले जाऊ शकते, असे तेल अवीव येथे होऊ घातलेल्या एचएलएस व सायबर परिषदेची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत कॅमेरून यांनी सांगितले.

चालू घडामोडी : २३ सप्टेंबर


भारत - फ्रान्समध्ये ३६ लढाऊ विमानांसाठी राफेल करार


भारत आणि फ्रान्समध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेला राफेल करार अखेर झाला आहे. शुक्रवारी दिल्लीत भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी राफेल विमानासाठी करार केला. 7.8 बिलियन यूरोमध्ये (भारतीय चलनानुसार 59 हजार कोटी रुपये) हा करार करण्यात आला आहे. या कारारामुळे आगामी पाच वर्षात 36 राफेल विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या करारामुळे भारतीय हवाई दलाची ताकद अजून वाढली असून यामुळे चीनवर वचक ठेवण्यास फायदा मिळणार आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स दौ-यावेळी 36 लढाऊ विमाने विकत घेण्याची घोषणा केल्यानंतर 16 महिन्यानंतर हा करार झाला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सचे संरक्षणमंत्री ड्रायन यांनी राफेल करारावर सह्या केल्या. 

या विमानांमुळे हवाई दलाला भारताच्या हद्दीत राहुनच पाकिस्तानवर निशाणा साधणे शक्य होऊ शकेल. या विमानात मिटीअर आणि मायका या दोन मिसाईल प्रणाली असतील. पाकिस्तानकडे सध्या असलेल्या प्रणालींपेक्षा ही प्रणाली जास्त संहारक आहे.

चालू घडामोडी : २० सप्टेंबर


स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या शहरांची नावे घोषित

  • केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी २० सप्टेंबर रोजी देशभरात विकसित करण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या शहरांची नावे घोषित केली.
  • स्मार्ट सिटीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये एकूण ६३ शहरांनी सहभाग घेतला होता; यामधील २७ शहरांची निवड करण्यात आली आहे.
  • या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यामधील कल्याण डोंबिवली, नागपूर, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिक या पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
  • स्मार्ट सिटीमुळे सेवा आणि व्यवस्था पारदर्शी व गतीमान होणार आहे. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होणार आहेत.