चालू घडामोडी : २० सप्टेंबर
स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या शहरांची नावे घोषित
- केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी २० सप्टेंबर रोजी देशभरात विकसित करण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या शहरांची नावे घोषित केली.
- स्मार्ट सिटीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये एकूण ६३ शहरांनी सहभाग घेतला होता; यामधील २७ शहरांची निवड करण्यात आली आहे.
- या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यामधील कल्याण डोंबिवली, नागपूर, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिक या पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
- स्मार्ट सिटीमुळे सेवा आणि व्यवस्था पारदर्शी व गतीमान होणार आहे. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होणार आहेत.
0 comments:
Post a Comment